breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Covid-19: दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे चालू करा- कुशाग्र कदम

पिंपरी |

दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे चालू करण्यात यावे अशी मागणी कुशाग्र कदम युथ फौंडेशनचे अध्यक्ष कुशाग्र कदम यांनी आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून शहरातील रुग्णांना उपचारासाठी असलेले आपल्या महापालिकेचे वाय.सी.एम. , जिजामाता , भोसरीचे कोविड हॉस्पिटल, जम्बो कोविड सेंटर, ऑटो क्लस्टर कोविड सेंटर, तसेच खाजगी रुग्णांलयामध्येही जागा मिळत नाही. मनपाने कोरोना लसीकरण मोहिम चालू केली आहे. त्यासाठी मनपाच्या सर्व रुग्णालयात, खाजगी रुग्णांलयांमध्ये तसेच स्वतंत्र लसीकरण केंद्रे चालू केली आहेत, त्याला नागरीक उत्तम प्रतिसाद देत आहेत.

परंतु शहरातील दिव्यांग नागरीकांना या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे त्रासाचे व गैरसोयीचे होत आहे. त्यांना रांगेत जास्त काळ थांबणे शक्य होत नाही. पिंपरी चिंचवड शहरात सुमारे दहा हजार दिव्यांग आहेत या दिव्यांग नागरीकांना स्वतंत्र लसीकरण केंद्र चालू केल्यास त्यांना सोयीचे व त्रासाचे होणार नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात दिव्यांगांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र त्वरीत चालू करण्यात यावे. म्हणजे दिव्यांग नागरीकांची गैरसोय होणार नाही व जास्तीत जास्त दिव्यांग नागरीकांचे लसीकरण होईल,असेही निवेदनात म्हटले आहे.

वाचा- #Lockdown: लॉकडाउन अंतिम पर्याय म्हणणाऱ्या मोदींवर राष्ट्रवादी काँग्रेसची टीका; म्हणाले…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button