breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना अटक; गुंड गजा मारणे प्रकरण भोवणार

पुणे |महाईन्यूज|

कुख्यात गुंड गजा मारणे प्रकरण माजी खासदार संजय काकडे यांना भोवण्याची शक्याता आहे. राज्यसभेचे माजी खासदार असलेल्या संजय काकडे यांनी पोलिसांनी अटक केली आहे. गजा मारणे प्रकरणावरून अटक झाल्याचं सांगण्यात येत आहे. पुण्यात त्यांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली असून पुणे शहर सहपोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी अशी कारवाई झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

भाजप नेते असलेल्या संजय काकडे यांचे राष्ट्रवादीसोबतही चांगले संबंध आहेत. त्यांनी गुंड गजा मारणे आणि निलेश घायवळ यांच्यातील मतभेद मिटवण्यात मोठी भूमिका बजावल्याचं म्हटलं जात होतं. गजा मारणे यांची खून प्रकऱणातून सुटका झाली तेव्हा मोठी रॅली काढण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी तळोजा जेलमधून सुटल्यानंतर पुण्यापर्यंत वाहनांची रॅली काढल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली होती. याप्रकरणी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामिण पोलिसांनी कारवाई करताना दोनशेपेक्षा जास्त वाहने ताब्यात घेतली होती. तसंच गजा मारणेविरोधात बेकायदा रॅली, गर्दी जमवणे, वडापावचे पैस न देणं, खंडणी मागणं इत्यादी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यानच्या काळात गजा मारणे फरार झाला होता. त्यानं तळेगाव दाभाडे इथं न्यायालयात गुपचूप जाऊन जामीनसुद्धा घेतला होता. त्यानंतर गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली. आता या प्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. गजा मारणेसह गुंड निलेश घायवळ यालाही अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून काकडे राजकारणापासून अलिप्त होते. त्यांनी कोणत्याही प्रकारचे राजकीय वक्तव्य करणं टाळलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button