breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#Covid-19: महाराष्ट्राचे माजी मंत्री संजय देवतळे यांचे करोनामुळे निधन

मुंबई |

राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, वरोरा-भद्रावती विधानसभेचे माजी आमदार संजय देवतळे यांचे आज नागपुरात करोनावरील उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ यांच्यासह मोठा परिवार आहे. मृदू स्वभावाचे राजकारणी अशी संजय देवतळे यांची ओळख होती. अभियांत्रिकी चे शिक्षण घेतलेले देवतळे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सक्रिय राजकारणाला सुरुवात केली होती. माजी मंत्री तथा त्यांचे काका दादासाहेब देवतळे यांच्या अकाली निधनानंतर माजी केंद्रीय अर्थ मंत्री व काँग्रेसचे तेव्हाचे खासदार शांताराम पोटदुखे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना वरोरा-भद्रावती विधानसभेची उमेदवारी मिळाली.

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ऍड. मोरेश्वर टेमुडे यांचा पराभव करून विजयी झाले होते. सलग २० वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. २०१४मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. तिथून त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर भाजपाने त्यांना उमेदवारी दिली. तेव्हा शिवसेनेत असलेले काँग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांनी २ हजार मतांनी त्यांचा पराभव केला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेतला होता. दरम्यान, त्यांना करोनाची लागण झाली होती. काही दिवसांपासून ते नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.

वाचा- बेपत्ता पाणबुडीतील सर्वांचा मृत्यू?

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button