breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपुणे

#Covid-19: पुणे विभागातील 7 लाख 84 हजार 684 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले- विभागीय आयुक्त सौरभ राव

  • विभागात कोरोना बाधित 9 लाख 28 हजार 732 रुग्ण

पुणे |

पुणे विभागातील 7 लाख 84 हजार 684 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 9 लाख 28 हजार 732 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 25 हजार 433 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 18 हजार 615 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.00 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.49 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 6 लाख 68 हजार 126 रुग्णांपैकी 5 लाख 57 हजार 424 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 99 हजार 899 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 हजार 803 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.62 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 83.43 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 75 हजार 428 रुग्णांपैकी 64 हजार 454 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 10 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 964 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 73 हजार 439 रुग्णांपैकी 61 हजार 709 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 572 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 158 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 56 हजार 737 रुग्णांपैकी 50 हजार 444 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 431 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 862 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 55 हजार 02 रुग्णांपैकी 50 हजार 653 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 521 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 828 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 13 हजार 449 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 10 हजार 112, सातारा जिल्ह्यात हजार 1 हजार 80, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 301, सांगली जिल्ह्यात 657 तर कोल्हापूर जिल्ह्यात 299 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 11 हजार 692 आहे. पुणे जिल्हयामध्ये 9 हजार 843, सातारा जिल्हयामध्ये 616, सोलापूर जिल्हयामध्ये 787, सांगली जिल्हयामध्ये 265 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 181 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 56 लाख 15 हजार 070 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 9 लाख 28 हजार 732 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

वाचा- अयोध्येतील राम मंदिरासाठी ११ लाख रुपयांचा निधी सुपूर्त

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button