breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

COVID 19 : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापालिका कर्मचा-यांचे 1 कोटी 10 लाख सुपूर्द

पिंपरी| महाईन्यूज| प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु.1,10,64,900/-सुपूर्त करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने covid-19 या रोगाचा सामना करण्याकामी मुख्यमंत्री निधीस आर्थिक सहाय्य म्हणून महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करून एकत्रित झालेली रक्कम रुपये १,१०,६४,९००/- (एक कोटी दहा लाख 64 हजार 900 रुपये फक्त) चा धनादेश आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

त्यावेळी जिल्हाधिकारी माननीय नवल किशोर राम साहेब, पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे, कोषापाल अविनाश ढमाले, चिटणीस योगेश रसाळ, सहसचिव बाळासाहेब कापसे, प्रमुख संघटक गोरख भालेकर, संघटक धनाजी नखाते, कार्यकारिणी सदस्य सुरेश गारगोटे, अमित जाधव, धनेश्वर थोरवे, अविनाश तिकोने, योगेश वंजारे, सुभाष लांडे, नवनाथ शिंदे, रणजीत भोसले, शुभांगी चव्हाण, बाळासाहेब साठे, मिलिंद काटे, अनिल राऊत, रवी रोकडे तसेच कस्ट्राईब एकता संघटनेचे अध्यक्ष गणेश भोसले, कामगार प्रतिनिधी उद्धवजी डवरी व नरेंद्र शेडगे इत्यादी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button