breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रसिद्ध मोरया गोसावी मंदिरात लहान मुले, जेष्ठ नागरिक, गरोदर महिलांना प्रवेश बंदी

पिंपरी – घटस्थापनेच्या दिवशी (गुरुवारी, दि.07) महाराष्ट्रातील मंदिरे खुली करण्यात आली आहेत. कोरोनामुळे दीड वर्षापासून जास्त कालावधीसाठी बंद असलेली मंदिरे दर्शनासाठी अखेर खुली करण्यात आली आहेत. पण, मंदीरात दर्शनासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

चिंचवडगावतील प्रसिद्ध मोरया गोसावी मंदिरात लहान मुले, जेष्ठ नागरिक, गरोदर महिलांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जाहीर नियमावली नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहेत नियम

– हातावरती सॅनिटायझर घेऊनच मंदिरात प्रवेश दिला जाईल.

– मास्क शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

– राज्य शासनाच्या सुचनेनुसार ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व गरोदर महिलांना मंदिरात प्रवेश बंदी आहे.

– सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) ठेवुनच श्रींचे दर्शन घ्यावे.

– आजारी व्यक्तिंना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

– मंदिर व मंदिर परिसरात धुम्रपान, थुंकल्यास अथवा मास्कचा वापर न केल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल.

– फुले हार नारळ, पेढे इ. मंदिरात आणु नये.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button