breaking-newsपिंपरी / चिंचवड

#Covid 19 : नगरसेविका सुजाता पालांडे निवारा केंद्रातील लोकांना करणार समुपदेशन

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे त्यांच्या संस्थेमार्फत निवारा केंद्रातील लोकांसाठी समुपदेशन करणार आहेत. यासाठी पालिकेची परवानगी घेण्यासाठी त्यांनी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे अर्ज केला आहे.

अर्जात पालांडे यांनी म्हटले आहे की, कोवीड- १९ च्या साथीच्या परिस्थितीत, मी आणि माझे कार्यसंस्था तात्पुरते निवारा केंद्रात राहिलेल्या लोकांसाठी समुपदेशन करू इच्छितो. आपल्या घरातून नेहमीच बाहेर पडणाऱ्या व्यक्ती, लॉकडाऊनचे महत्त्व समजू न शकणारे, अशा लोकांसाठी आम्हाला समुपदेशन करण्याची परवानगी हवी आहे, आणि आम्ही पीसीएमसीमध्येही कम्युनिटी पोलिसिंग तयार करू इच्छितो. या कठीण वेळी योगदानासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी पालांडे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button