breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयानं ठरवलं दोषी!

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयानं ट्रम्प यांना दोषी ठरवलं आहे. लैंगिक छळ आणि बदनामी केल्याबद्दल त्याला ५ लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.

एका मासिकाच्या लेखक ई. जीन कॅरोल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मॅनहॅटनमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या ड्रेसिंग रूममध्ये १९९६ मध्ये ट्रम्प यांनी कॅरोल यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप कॅरोल यांनी केला होता. ज्यारीनं कॅरेल यांचा बलात्काराचा आरोप नाकारला, कारण हा खटला फैजदारी न्यायालयात नव्हे तर दिवाणी न्यायालयासमोर आणला गेला होता.

हेही वाचा – धक्कादायक! बागेश्वर धाममधून लोक होतायत बेपत्ता, ४ महिन्यांत २१ लोक बेपत्ता

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला सार्वजनिकरित्या अपमानस्पद आणि बदनामीचं कारण म्हटलं आहे. ट्रम्प यांच्याविरोधात या प्रकरणाची सुनावणी २५ एप्रिलपासून सुरू झाली होती आणि आता नऊ सदस्यांच्या ज्युरीनं ट्रम्प यांना शोषणप्रकरणी दोषी ठरवलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मॅनहॅटनमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या ड्रेसिंग रूममध्ये ट्रम्प यांनी १९९६ मध्ये एका मासिकाच्या लेखक ई. जीन कॅरोल यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. कॅरेल यांनी २०१९ मध्ये एका पुस्तकात या घटनेचा सर्वात आधी उल्लेख केला होता. गेल्या काही वर्षात डझनहून अधिक महिलांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केल्याची माहिती आहे. यामध्ये पॉर्नस्टार स्टॉमी डॅनियल्सच्या बाबतीत ट्रम्प यांच्यावर बरीच नाराजी होती. लैंगिक छळाच्या या प्रकरणांमुळे ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या योजनेला धक्का बसणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button