TOP Newsआंतरराष्टीयआरोग्यदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवड

देशातील पहिली एकात्मिक वंध्यत्व निवारण कार्यशाळा उत्साहात

प्रीशा फर्टिलीटी सेंटर, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन, वात्सल्य हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन

पिंपरी-चिंचवडः

वंध्यत्व ही आजची ज्वलंत समस्या आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अकाली वंध्यत्व ही समस्या स्त्री, पुरुषांमध्ये अचानकपणे अतिशय वेगाने वाढणारी व जटील समस्या आहे. यातून होणारे शारीरिक व मानसिक नुकसान टाळता यावे व अपेक्षीत असणारी गर्भधारणा लवकरात लवकर कमी खर्चात, कमी त्रासाने निसर्ग नियमानुसार व्हावी, यासाठी एकात्मिक (पारंपरिक आयुर्वेद आधुनिक अॅलोपॅथी) एकत्र आणून ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. अशा प्रकारची कार्यशाळा आयोजनाचा जगातील हा पहिलाच प्रयोग असावा. ही संकल्पना वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. जीवन चौधरी यांनी सर्वप्रथम मांडली. तसेच तज्ज्ञ सहकारी सोबत घेऊन ही कार्यशाळा राबविण्यात आली. यासाठी प्रीशा फर्टिलीटी सेंटर तसेच महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन, वात्सल्य हॉस्पिटल यांनी संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

शिबीरात यांचे लाभले उत्तम मार्गदर्शन…
या कार्यशाळेत प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येक वंध्यत्वाच्या प्रकारावर आधी आधुनिक उपचार पद्धती व नंतर पारंपरिक उपचार पद्धतीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. योगेश चौधरी, गुप्तरोग तज्ज्ञ डॉ. दीपक माने, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. स्वाती म्हस्के, पुरुष वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. सुनील म्हस्के, आयुर्वेदाचार्य डॉ. विद्या देवरे, डॉ. रत्नप्रभा चौधरी, वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. श्रद्धा चौधरी, डॉ. प्रशांत सूर्यराव, आदींनी सकाळी पहिल्या सत्रात उत्तम मार्गदर्शन केले. त्यानंतर वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. जीवन चौधरी, पुण्याचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. दिलीप गाडगीळ, प्रसिद्ध आयुर्वेदाचार्या डॉ. स्वाती मोहिते, डॉ. कल्याणी गाडे, डॉ. सुहास लंगोटे, बीजतज्ज्ञ पवन कुलकर्णी आदींनी मार्गदर्शन केले.

यांचे मोलाचे सहकार्य लाभले…
या कार्यशाळेसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर येथून सुमारे दीडशे जणांनी वंध्यत्व निवारण कार्यशाळेत सहभाग नोंदविला. या कार्यशाळेच्या नियोजनात डॉ. रोहिदास अल्हाट, डॉ. संदीप कवडे, डॉ. शंकर गोरे, डॉ. अर्चना गोरे, डॉ. प्रियांका विधाते, डॉ. अविनाश देवरे, डॉ. विपुल जैस्वाल, डॉ. स्वप्नील शिंदे, तसेच डॉ. महेश शेटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. रोहिदास अल्हाट, तर सूत्रसंचालन डॉ. अर्चना गोरे यांनी केले.

या कार्यशाळेमुळे उपस्थित डॉक्टरांचे ज्ञानवर्धन झाले. अशा प्रकारच्या कार्यशाळा ठिकठिकाणी आणखी आयोजित व्हायला हव्यात, अशी इच्छा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आल्या. सर्वांना प्रशस्तीपत्रक देऊन डॉ. महेश शेटे यांनी आभार मानले. प्रीशा फर्टिलीटी सेंटर व महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन यांनी अशा अनेक कार्यशाळा आयोजित करण्याचा यावेळी संकल्प सोडला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button