breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

टाटांच्या TCS मध्ये १०० कोटींचा नोकरी घोटाळा, ४ अधिकारी निलंबित

पुणे : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या TCS कंपनीमध्ये अता घोटाळा झाल्याची माहिती मिळाली आहे. नोकरीच्या बदल्यात लाच माहितल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये नेकऱ्या देण्याच्या बदल्यात कोट्यवधींचे कमिशन घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात मोठ्या आयटी कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात काही बड्या अधिकाऱ्यांनी कन्सल्टन्सी स्टाफिंग फर्मकडून मोठं कमिशन घेतले. हा संपूर्ण भाग एका व्हिसलब्लोअरने उघड केला आहे. टीसीएसच्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुपचे जागतिक प्रमुख ईएस चक्रवर्ती अनेक वर्षांपासून कर्मचारी कंपन्यांकडून त्यांना कंपनीच नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात कमिशन घेत असल्याचा आरोप व्हिसलब्लोअरने केला आहे. TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबातची माहिती दिली आहे.

हेही वाचा – समीर वानखेडेंना २८ जूनपर्यंत अटक नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

TCS मध्ये नोकरी मिळवण्याच्या बदल्यात हा भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात झाला हे सांगता येणं सध्या कठीण आहे. परंतु असे मानले जात आहे की, यातील लोकांनी किमान १०० कोटी रूपये कमिशन घेतले आहेत. खरं तर RMG विभाग दररोज नवीन भरतीसह सुमारे १४०० अभियंत्यांना विविध प्रकल्पांवर नियुक्त करतो. याचा अर्थ TCS चा RMG विभाग दर मिनिटाला नवीन प्लेसमेंट करतो, यावरूनच घोटाळ्याची कल्पना करू शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button