breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप-शिवसेना युतीनंतर लक्ष्मण जगताप यांची भाजपला सोडचिट्ठी?

  • मावळ लोकसभेसाठी लक्ष्मण जगताप राष्ट्रवादीकडून इच्छुक
  • पॉलिटिकल रिसर्च अँण्ड अँनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेचा अंदाज

पिंपरी (महा ई न्यूज) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. युतीनंतर मावळ लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडे राहणार यात दुमत नाही. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपला सोडचिट्टी देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जगताप हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर मावळातून लोकसभा लढणार असल्याचा अंदाज पुण्यातील पॉलिटिकल रिसर्च अँण्ड अँनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेने वर्तविला आहे. हा अंदाज खरा ठरल्यास आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मावळ मतदार संघात मोठी राजकीय उलथापालथ झाल्याची दिसणार आहे.

पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारीला शरद पवार यांनी असमर्थता दर्शवली असून पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली, तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याना संधी कधी मिळणार? असा प्रश्न शरद पवार यांनी मुंबई येथील पक्षाच्या बैठकीत उपस्थित केला आहे. शरद पवार यांच्या प्रतीप्रश्नावर अजित पवार यांनी या बैठकीत सूचक मौन बाळगले असल्याचे समजते. दरम्यान, मावळ मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास ते इच्छुक आहेत. भाजप – सेना युती झाल्यास लक्ष्मण जगताप भाजपला सोडचिट्ठी देतील अशी शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणून लक्ष्मण जगताप यांचा सुरु झालेला प्रवास राष्ट्रवादी ते शेकाप असा होऊन पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष प्रवेशापर्यंत पोहोचला, हा प्रवास आगामी लोकसभा निवडणुकीत पूर्ण गोलाकार होऊन पुन्हा राष्ट्रवादी पक्षाकडे चक्राकार पद्धतीने सुरु राहणार की काय, अशी चर्चा सुरु आहे.

अशी राजकीय उलथापालथ झाल्यास पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण ढवळून निघेल. मावळ लोकसभा मतदार संघाचा पवार यांनी बैठकीत आढावा घेतला. मतदार संघात पक्षाची बांधणीची माहिती घेतली. कोण कोण इच्छुक आहे, याची माहिती घेतली. राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आपण मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. संजोग वाघेरे यांनी मतदार संघातील राजकीय परिस्थितीची माहिती शरद पवार यांना दिली. शरद पवार यांनी यावेळी मावळातून राष्ट्रवादीचा खासदार निवडून आलाच पाहिजे. सर्वांनी एकदिलाने काम करा, अशा सूचना दिल्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button