breaking-news

#CoronoVirus:मालेगावात आणखी 36 कोरोना पॉझिटिव्ह सापडले, 9 वर्षाच्या मुलाचाही समावेश

नाशिक : मुंबई पुण्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर राज्यातील  कोरोना हॉटस्पॉट बनलं आहे. नुकतंच मालेगावात 36 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मालेगावमध्ये कोरोनाबाधितांचा आकड्यामध्ये वाढ झाली असून तो 150 च्या पार गेला आहे.

मालेगावात आज (28 एप्रिल) आणखी 36 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात एका 9 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. त्यामुळे मालेगावमधील कोरोना रुग्णांची संख्या 162 वर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी मालेगावातील 7 जण कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे मालेगावात नागरिकांच्या चिंता काहीशी कमी झाली होती.

पण त्यानंतर आज पुन्हा 36 नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनाला धक्का बसला आहे. मालेगाव शहरातील एकूण 14 परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मालेगावमधील मोमीनपुरा, कमालपुरा, मदिना बाग, इस्लामाबाद, आझाद नगर, दत्त नगर हे भाग झोपडपट्टीचे आहे. तर इतर भाग हा चांगला, तर काही दाट लोक वस्ती असलेला भाग आहे. त्यामुळे ही रुग्णांची संख्या वाढत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button