breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronoVirus:पुण्यात रेशन दुकानातील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून नियमावली

पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्य सरकारमार्फत अनेक गरीबांना मोफत धान्य देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील रेशन दुकानातून केशरी कार्डधारकांना धान्य देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी धान्य वितरणासाठी दुकानदारांना नियमावली घालून दिली आहे.

या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करणं सर्व दुकानदारांना बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास दुकान बंद करण्याचे आणि नागरिकांना घरी परत जाण्याचे पोलिसांकडून निर्देश दिले जाऊ शकतात, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

केशरी शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव धान्य दुकानात सवलतीच्या दरात धान्य वितरीत करण्यात येते. त्यावेळी विनाकारण दुकानात गर्दी होऊ नये, संसर्ग दूर ठेवता यावा यासाठी पोलिसांकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय अन्नधान्य वितरण कार्यालयाकडूनही एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यानुसारच नागरिकांना धान्य वितरीत करण्यात येणार आहे.

काय आहे पोलिसांची नियमावली

  • सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत दुकान चालू ठेवण्यास परवानगी राहिल.
  • टोकन मिळविण्यासाठी नागरिक सकाळी 8 पूर्वी गर्दी करू शकतात़.
  • त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त असणार आहे.
  • नागरिकांनी उभे राहताना सामाजिक अंतर ठेवून रांगेत उभे राहावे.
  • त्यासाठी दुकानदारांनी रांगेचे योग्य मार्किंग करावे लागणार आहे.
  • आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपकाची सोय करणे दुकानदारांना बंधनकारक
  • सर्व शिधापत्रिकाधारकांना टोकन वितरित करुन पहिल्या 100 शिधापत्रिका धारकांना प्रथम धान्य वितरण करण्यात येईल़.
  • उर्वरित शिधापत्रिका धारकांना वेळापत्रकांप्रमाणे पुढील तारखेचे टोकन देण्यात येईल़
  • प्रत्येक तासाला 15 टोकनधारक याप्रमाणे दिवसाला किमान 100 जणांना धान्य वितरण करण्यात येईल़
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button