breaking-newsTOP Newsपुणे

रेहान एंटरप्राइजेसच्या गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक 

  • पुण्यातील ८०० हून अधिक गुंतवणूकदारांचा समावेश 
  • संपूर्ण देशात तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची फसवणूक 

पुणे : अतुल्य ग्रुप ऑफ कंपनीज च्या नावाखाली २०१६ ला रेहान एंटरप्राइजेस नावाने मुंबईत कंपनी सुरू झाली. रेहान चे मालक महादेव जाधव आहेत .सुरुवातीला सिंगापूर आणि दुबईला ऑफिस असल्याचे सांगण्यात आले. शेअर मार्केट क्रिप्टो करन्सी रियल इस्टेट फॉरेक्स इत्यादी मध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे अमिश दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती या कंपनीत गुणवणूक केलेल्या पुण्यातील गुंतवणूकदारांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. आम्ही पैसे गुंतवले आणि त्यात मोठे नुकसान झाले आहे यापुढे अजून कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी ही पत्रकार परिषद घेत असल्याचेही पीडितांनी नमूद केले. 

यावेळी रेहान एंटरप्राइजेस फसवणूक झालेले माजी पोलिस अधिकारी आळेकर, ऍड मंदार जोशी,स्मिता कामत, ध्रुव नाईक यांच्यासह अन्य गुंतवणूकदार उपस्थित होते. 

या फसवणूक प्रकाराबाबत माहिती देतांना त्यांनी सांगितले की, रेहान इंटरप्राईजेसने पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली सह  गुजरात, वाराणसी, लखनऊ आणि देशातील इतर राज्ये व शहरांमध्ये आपले एजंट नेमले. या एजंटनी आजपर्यंत साधारण ११ हजार  गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी तयार केले. सुरुवातीला गुंतवणूकदारांना नफ्याचे पैसे देण्यात आले काही लोकांना काहीच पैसे मिळालेले नाहीत .पुण्यात असे ७०० ते ८०० गुंतवणूकदार आहेत.  यात सामान्य घरातील पुरुष- महिला, डॉक्टर्स, पोलीस, वकील आणि  विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या लोकांनी आपले तुटपुंजी रक्कम जमा करून रेहान मध्ये गुंतवले आहेत. रेहान चे मुंबई ऑफिस बंद केले आहे पुण्यातील बाणेर भागातील ऑफिस देखील बंद केले आहे. यातील काही गुंतवणूकदारांना संशय आल्याने चौकशी केली असता , संपर्क केला असता त्यांना उडवा उडवी ची उत्तर देण्यात आली तसेच धमकीही देण्यात आली. “तुम्हाला पाहिजे तर पोलिसात जावा आता सरकार आमचे आहे कोणी काही बिघडू शकत नाही अशा पद्धतीने धमकवण्यात आले”. काही एजंट पैकी एक किशोर बारस्कर नावाच्या एजन्ट पुण्यातील गुंतवणूकदारांना “आम्ही सगळे पैसे दिले आहेत आता तुम्हाला काय करायचं ते करा अशा स्वरूपाचे धमक्या दिल्या आहेत.” रेहान इंटरप्राईजेस विरोधात लखनऊ येथे पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली तसेच वाराणसीला पण गुंतवणूकदारांनी तक्रार नोंदवली आहे. पुण्यातल्या गुंतवणूकदारांनी पुणे पोलिसांकडे तक्रार नोंदवली  असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मुंबईत देखील रेहान विरोधात तक्रार नोंदवल्या गेल्या आहेत. एका शहरात गुंतवणूकदार जमा करायचे तिथे उघडकीस आले की दुसऱ्या शहरात ऑफिस थाटायचे अशा स्वरूपाचे त्यांची कार्यपद्धती दिसून येते. संपूर्ण देशात साधारण ३००० ते ३५०० करोड रुपया ची फसवणुकीचा प्रकार असून रेहान आता नवीन कंपनी स्थापन करून गुजरात मध्ये शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार करत आहे. पोलिसांनी रेहान कंपनीच्या मालक तसेच एजंट यांना त्वरित अटक करावी वेळ पडली तर सीबीआय चौकशी करावी अशी मागणी या गुंतवणूकदारांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button