breaking-newsताज्या घडामोडी

#coronovirusऔरंगाबादेत कोरोनाचा कहर, 24 तासात 7 नव्या रुग्णांची नोंद

औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना औरंगाबादेतही कोरोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या 24 तासात औरंगाबादमध्ये 7 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. या सर्वांवर औरंगाबादेतील मिनी घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

औरंगाबादमध्ये आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची काल (25 एप्रिल) नोंद करण्यात आली. गेल्या 24 तासात 7 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा समावेश आहे. या तिन्ही महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

औरंगाबादमध्ये आतापर्यंत 47 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर औरंगाबादेतील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर दुसरीकडे औरंगबादेतील 6 पॉझिटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यांना त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

औरंगबाद शहरात आतापर्यंत 47 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील जिल्हा रुग्णालयातील 14 तर खासगी रुग्णालयातील 2 अशा 16 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

तर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मराठवाड्यातील 8 पैकी 3 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहे. तर औरंगबाद वगळता इतर 4 जिल्ह्यांमध्येही कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील किमान 7 जिल्हे लवकरचं कोरोनावर मात करण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button