breaking-newsताज्या घडामोडी

#coronovirus:येवल्यात कोरोनाचा शिरकाव, मालेगावच्या संपर्कात असलेल्या महिलेला कोरोना

नाशिक : येवल्यात कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळून आल्याने शहरात दहशतीचं वातावरण आहे. मालेगावात कोरोनाने भीषण रुप घेतल्यानंतर आता येवल्यात एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. ही महिला मालेगावच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

मालेगाच्या संपर्कात असल्याने या महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. येवल्यात एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या महिलेला गुरुवारी कोरोनाची लक्षणं आढळून आल्याने तिला नाशिकला हलवण्यात आले. तिथे तिचा कोव्हिड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

यानंतर शहरात धाकधूक वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून येवला शहरातील तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.

कोरोनाबाधित महिलेच्या 9 नातेवाईकांच्या कोरोना तपासणीसाठी नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची चौकशी आणि तपासणीही होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button