breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#Coronolockdown:सांगली जिल्ह्यात दारू दुकानांसह इतर गोष्टींना सशर्त परवानगी

सांगली : राज्य सरकारकडून झोननिहाय नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात दारू दुकानांसह अन्य दुकाने सोमवारपासुन सुरू होणार आहेत. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. बाजारपेठेतील मात्र कोणतेही दुकान उघडता येणार नाहीत. तसेच लग्न कार्यावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर इस्लामपूर शहर कंटेनमेंट झोनमुक्त करण्यात येणार असल्याचंही जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केलं. सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेल्याने सोमवारपासून अनेक निर्बंध प्रशासनाकडून शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात येणार नाही.

सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांनी खरेदीसाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, मास्क, सोशल डिस्टन्स आणि कोरोना नियम पाळणे गरजचे आहे. तसेच 65 वर्षीय व्यक्ती, गर्भवती महिला आणि 10 वर्षांच्या आतील मुलांना मात्र घराबाहेर पडण्यास बंदी आहे. अत्यावश्यक कारणासाठी फक्त या सर्वांना बाहेर पडता येणार आहे.

सांगलीमध्ये काय सुरू होणार?

  • रहिवाशी क्षेत्रात पाच दुकाने सुरू.
  • जीवनावश्यक वस्तूंबरोबर इतर सर्व दुकाने होणार सुरू.
  • हेअर सलून, ब्युटी पार्लर.
  • दारू दुकाने फक्त पार्सल.
  • लग्न कार्याला 50 लोकांची परवानगी.
  • अंत्यविधीला 20 लोकांना परवानगी.
  • सर्व उद्योग सुरू करण्याला परवानगी. मात्र, मजूर कामगारांची जवाबदारी व नियम पाळून कारखाने सुरू करण्याची अट.
  • प्रवासासाठी टॅक्सी, रिक्षा, दुचाकी यांना सोशल डिस्टन्स पाळून वाहतूक करण्याची परवानगी.
  • ग्रामीण भागासह शहरी भागातील बांधकामांना परवानगी तर शहरी आणि ग्रामीण भागातील रहिवाशी क्षेत्रात किराणामाल दुकानाबरोबर इतर पाच दुकाने फक्त सुरू करता येणार आहेत. एका रांगेत एकापेक्षा पाच दुकाने असतील तर त्याठिकाणी दुकाने सुरू करता येणार नाही, असे यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button