breaking-newsआरोग्य

#coronolockdown:लॉकडाऊनमुळे मूड स्विंग्सचा सामना करताय? जाणून घ्या उपाय

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. भारतातही लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशातच अनेक लोक आपल्या घरातच बंद आहेत. त्यामुळे अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तुम्हालाही अचानक राग योतो का?, अचानक खूश होता का?, अचानक राग अनावर होऊन आक्रमक होता? किंवा कोणाला राग आला तर त्याची खिल्ली उडवता का? याव्यतिरिक्त तणाव, कंटाळा, एखादी गोष्ट आठवण्यात त्रास होणं, निर्णय घेण्यास भिती वाटणं, एकाग्रता कमी होणं, अशक्तपणा येणं, चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारख्या समस्यांचा सामना करत असाल तर तुम्हीही मूड स्विंग्सचे शिकार झाला आहात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नक्की मूड स्विंग आहे तरी काय?

मूड स्विंग्स हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. जो लोकांच्या मानसिक गोष्टिंशी निगडीत आहे. लॉकडाऊन एक असामान्य परिस्थिती आहे. एक अशी घटना जी अचानक झाली असून अप्रत्यक्षपणे आलेली आहे. लॉकडाऊनमुळे आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. संपूर्ण रूटिन बदलून गेलं आहे. अशा परिस्थितीत मूड चेंज होणं किंवा मूड स्विंग्स सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

मूड स्विंगचा थेट परिणाम आपल्या मनस्थितीवर होत आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मानसशास्त्र तज्ज्ञ मनीषा सिंघल यांनी या समस्येपासून सुटका करू घेण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

मूड स्विंग्स दूर करण्यासाठी शांत राहा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. घरात राहुनही जेवढं शक्य असेल तेवढं तुमचं रूटीन मेन्टेन करण्याचा प्रयत्न करा. अल्कोहोलचं सेवन करणं शक्य तेवढं टाळा. धुम्रपान करू नका. लॉकडाऊनमध्येही आपलं मानसिक आरोग्य जपण्यासाठी काही गोष्टी आहेत, ज्या आपण करू शकतो.


मूड स्विग्सपासून सुटका करण्यासाठी तुम्हाला तुमचं रूटिन सेट करावं लागेल. वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं. आपल्या कुटुंबियांसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करणं अशा गोष्टीही मूड स्विंग्सपासून सुटका करण्यासाठी मदत करतात. आपल्या सर्वांनाच माहित आहे की, व्यायाम केल्याने आपल्या शरीराला फायदे होतात. पण व्यायाम केल्यामुळे आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.

लॉकडाऊनमध्ये मूड स्विंग्स दूर करण्यासाठी उपाय :

दररोज व्यायाम करा
वेळेत जेवण करा
वेळेत झोपा
स्वतःवर विश्वास ठेवा
जास्त विचार करू नका
कुटुंबासोबत वेळ घालवा
सकारात्मक विचार करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button