breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

CoronaVirus : “Rapid Response Team” मध्ये शिक्षकांची घुसमट, विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ

शिक्षकांना दोनदा दिले वेगवेगळे आदेश

शिक्षकांनी मागितली राज्य सरकारकडे दाद

पिंपरी |महाईन्यूज | प्रतिनिधी

करोना बाधित व संशयित रुग्णांची माहिती शोधण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या Rapid Response Team मध्ये शिक्षकांची नेमणूक केली. हे काम करताना शिक्षकांना याचा संसर्ग झाल्यास शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुध्दा याचा धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पथकातील शिक्षकांना या कामाव्यतिरिक्त Home To Work करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला. परदेशातून आलेल्या नागरिकांना याची बाधा झाल्याने वेळीच परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. करोनाग्रस्थांची माहिती शोधून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यासाठी Rapid Response Team तयार केल्या आहेत. त्यामध्ये एकुण २८७ कर्मचा-यांचा सहभाग आहे. त्यामध्ये महापालिकेच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, क्रिडा आणि आयटीआयच्या २०२ शिक्षकांची नेमणूक केली आहे.

घरोघरी जाऊन हे शिक्षक माहिती संकलित करत आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती, करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची माहिती, संशयित रुग्ण आदींची माहिती संकलित करून त्या त्या विभागातील आरोग्य निरीक्षकांना अहवाल कळविण्याचे काम शिक्षक करत आहेत. हे काम करताना शिक्षकांना आरोग्याच्या सुरक्षेसाठी किट देण्यात आलेली नाही. जर एखाद्या शिक्षकाला या भयंकर विषाणुचा संसर्ग झाल्यास त्याच्या जिवावर बेतू शकते. हा शिक्षक शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार असतो. त्यांच्यापासून विद्यार्थ्यांना देखील धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच शिक्षकांना वैद्यकीय क्षेत्राचे ज्ञान नसते. अशा परिस्थितीत ते स्वत:ची सुरक्षा करू शकणार नाहीत. त्यामुळे Rapid Response Team मधून शिक्षकांची सुटका करावी. त्यांना Home To Work अंतर्गत कामे द्यावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व‌ केंद्र प्रमुख सभा या संघटनेने राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सर्वेक्षणाचे काम आणि निर्गमित आदेशातील विसंगती

शिक्षकांचा थेट संबंध विद्यार्थ्यांशी येत असल्याने व पुढेही येणार असल्याने खबरदारी म्हणून  शिक्षण उपसंचालक पुणे तसेच प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी पुणे  व  प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड मनपा यांचेही स्वयंस्पष्ट शिक्षकांसाठी आदेश आहेत की, शिक्षकांनी 31मार्चपर्यंत घरीच थांबावे. शिक्षक इतरत्र फिरतांना आढळल्यास प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडून कारवाई करण्यात येईल, असे सक्त आदेश असतानांही शिक्षकांना संशयित कोरोना रुग्ण शोधणेकामी दिलेले सर्वेक्षणाचे काम या आदेशांच्या पूर्ण विसंगत आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button