breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: Good News!भारतात प्रथमच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या पुढे गेली कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या

भारतात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ७६ हजारपर्यंत पोहोचली आहे. मागच्या २४ तासात ९,९८५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. देशाच्या वेगवेगळया भागात दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. दरम्यान देशात प्रथमच करोनामुक्त झालेल्यांची संख्या अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्णांच्या पुढे गेली आहे. ही एक दिलासादायक बाब आहे.

आतापर्यंत देशात एकूण १ लाख ३५ हजार २०६ रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरे झाले आहेत. १ लाख ३३ हजार रुग्णांवर अजूनही करोना व्हायरससाठी उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण ७,७४५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात २७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोना व्हायरसचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनलेल्या महाराष्ट्रात अजूनही कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झालेले नाही असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या ९० हजारपर्यंत पोहोचली आहे. चीनच्या वुहानला महाराष्ट्राने मागे टाकले आहे. वुहानमध्ये ८४ हजार रुग्ण होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button