breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: 26 मार्च रोजी होणारी राज्यसभेची निवडणूक रद्द

राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली होती. 26 मार्च रोजी या 55 जागांसाठी मतदान घेण्यात येणार होतं. मात्र, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे, २६ मार्च रोजी  होणारी राज्यसभेची निवडणूकही रद्द करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले..

महाराष्ट्रातील 7 जागांसह देशातील 17 राज्यांतील राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. या जागांवरील सध्याच्या सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे.

राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली होती. त्यानुसार, 6 मार्च रोजी अर्ज उपलब्ध होणार होते. 13 मार्चपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे होते. 16 मार्च रोजी अर्जांची छाननी होऊन 18 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर, 26 मार्च रोजी राज्यसभेच्या 55 जागांसाठी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली आहे. तर मतदानादिवशीच म्हणजे 26 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांची घोषणा होणार होती. मात्र, निवडणूक आयोगाने २६ मार्च रोजी होणारी राज्यसभेची निवडणूक रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे, उर्वरीत १८ सदस्यांसाठीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button