breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

कतरिना कैफचा घरातील भांडी घासतानाचा व्हीडिओ पाहिलात का?

मनोरंजन विश्वानं ३१ मार्चपर्यंत चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वच कलाकार हे घरीच आहेत. एरव्ही चित्रीकरणामुळे नेहमीच व्यस्त असणारे कलाकार घरी कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करत आहे.दोन ते तीन दिवसांपूर्वी अमेय वाघने घरी तो भांडी घासत असल्याचा व्हि़डिओ पोस्ट करत त्याने अनेक सुचना दिल्या होत्य…आता अभिनेत्री कतरिना कैफनंही सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आहे , ज्यात ती घरातील भांडी घासताना दिसत आहे. 

विशेष म्हणजे कतरिनानं भांडी घासताना काही खास टीप्सही दिल्या आहे. कतरिनानं पोस्ट शेअर केल्यानंतर अल्पावधित तिच्या पोस्टवर  अभिनेता अर्जुन कपूरची भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. 

ही तर ‘कांताबेन २.०’ आहे अशी मजेशीर प्रतिक्रिया अर्जुन कपूरनं दिली आहे. इतकंच नाही तर या कामासाठी माझ्या घरात तुझं स्वागत आहे असंही अर्जुन म्हणाला आहे. कतरिनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button