breaking-newsआंतरराष्टीय

भारताशी संबंध सुधारण्याबाबत कायद्यावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

भारताशी संबंध सुधारण्याबाबत कायद्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुले आता दोन्ही देशांच्या आर्थिक, व्यूहात्मक आणि संरक्षणविषयक संबंधांना कायद्याचे कोंदण लाभले आहे. त्यातून चीनच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्याचा अमेरिकेचा हेतू आहे.

चीनने संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर हक्क सांगत गेल्या काही वर्षांत त्या प्रदेशातील कारवाया वाढवल्या आहेत. त्यामुळे सागरी सीमांविषयक नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. चीनच्या या कारवायांना आळा घालण्यासाठी अमेरिकेने भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या सहकार्याने नवी आघाडी उघडली आहे. त्यानुसार या चार देशांमध्ये चीनला आवर घालण्यासाठी आर्थिक, संरक्षण आणि व्यूहात्मक विषयांमध्ये सहकार्य केले जात आहे. या व्यवस्थेला आता अमेरिकेने कायद्याचा आधार घालून दिला आहे.

एशिया रिअ‍ॅश्युरन्स इनिशिएटिव्ह अ‍ॅक्ट नावाचा कायदा ट्रम्प यांनी संमत केला असून त्याच्या कलम २०४ अनुसार भारत आणि अमेरिकेमध्ये सहकार्य वाढीस लागण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. अमेरिकेचे सिनेटर कॉरी गार्डनर एड मार्के यांनी हे विधेयक मांडले होते. आता ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी केली असून त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील संरक्षण सहकार्य वाढीस लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button