breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: 24 तासांत सर्वाधिक रुग्ण झाले निरोगी, तर रुग्णांची संख्या 12 लाखांच्या जवळ

नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशात 11 लाख 92 हजार 915 कोरोना रुग्ण आहेत. आज सलग चौथ्या दिवशी 24 तासांत 35 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 24 तासांत 37 हजार 724 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 648 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज एकाच दिवसात तब्बल 27 हजार 589 रुग्ण निरोगी झालेले आहेत.

एकाच दिवसात सर्वात जास्त निरोगी रुग्णांचा रेकॉर्ड ब्रेक आकडा आहे. यासह भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 63.12% झाला आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार. देशात सध्या 4 लाख 11 हजार 133 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 28 हजार 732 रुग्णांचा मृत्य़ू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 7 लाख 53 हजार 49 रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा सकारात्मकता दर 10.99% आहे. जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका, ब्राझीलनंतर तिसरा क्रमांक भारताचा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button