breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पार्किंगचा ‘शुभयोग’ : आमदार महेश लांडगे ‘एक कॉल… प्रॉब्लेम सॉल्व्ह..’!

  • अखेर शुभयोग सोसायटीची पार्किंग समस्या सुटली
  • बारणेवस्ती, मोशी येथील सदनिकाधारकांना न्याय

पिंपरी । प्रतिनिधी
सदनिका बुकिंगवेळी पार्किंग देण्याचा शब्द देऊनही बांधकाम व्यावसायिकाने टाळटाळ केली. अडगळीच्या ठिकाणी निरूपयोगी, कमी जागेच्या पार्किंग देऊन फसवणूक केली. सोसायटी धरकांनी पार्किंग मिळवण्यासाठी दोन वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही पदरी निराशा आली. अखेर आमदार महेश लांडगे यांच्याकडे धाव घेतली अन बारणेवस्ती, मोशी येथील निर्मिती शुभयोग सोसायटीतील सदनिकाधारकांना हक्काच्या पार्किंगचा ‘शुभयोग’ लाभला.
मोशी परिसरात बारणेवस्ती येथे निर्मिती इन्फ्रा प्रोजेक्टची ‘निर्मिती शुभयोग’ ही ९२ सदनिकांची सोसायटी आहे. त्यापैकी ८० फ्लॅटमध्ये रहिवासी वास्तव्याव आहेत. दरम्यान सदनिकांची बुकिंग करत असताना सर्वांन पार्किंग मिळेल, असे आश्वासन बिल्डर प्रतिनिधींकडून दिले होते. एप्रिल २०१९ पासून याठिकाणी रहिवासी वास्तव्याव आहेत. मात्र, पार्किंगच्या नावावर बिल्डरकडून कमी जागा असणारी अडगळीची तसेच ज्या ठिकाणी ॲम्बुलन्स, अग्निशमन वाहन किंवा अत्यावश्यक सेवा पोहोचू शकत नाही अशा पद्धतीची पार्किंग दिली ही. पार्किंग वापरण्यास अयोग्य असल्याने रहिवाशांनी वेळोवेळी बिल्डरकडे पाठपुरावा केला. मात्र, समस्या सोडवणे दूरच तर अडचण ऐकून घेण्यासही बिल्डरने नकार दिला.

… असा सुटला पार्किंगचा तिढा
सोसायटीतील रहिवाशांनी मोशी-चिखली- चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांची भेट घेतली. सांगळे यांच्या सांगण्यानुसार शेवटचा पर्याय म्हणून रहिवाशांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. आमदार लांडगे यांनी तात्काळ संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या जबाबदार प्रतिनिधीशी संपर्क साधला. आमदार लांडगे यांच्या कार्यालयीन प्रतिनिधींनी पाठपुरावा सुरू केला. शुक्रवारी (दि.२५) पहिल्यांदाच बिल्डर प्रतिनिधी, महापालिका अधिकारी, सोसायटी सदस्य, फेडरेशनचे संजीवन सांगळे यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये बिल्डर प्रतिनिधींनी शेजारी सुरू असणाऱ्या साईटमध्ये तसेच इमारतीच्या पोडियममध्ये एकूण २२ ते २४ अतिरिक्त पार्किंग देण्याचे मान्य केले. त्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.

‘ती’ वेळच नाही येणार; दादा पाठिशी!
पार्किंगची समस्या सोडवण्याबाबत बिल्डर प्रतिनिधींनी तोंडी आश्वासन दिले आहे. समाजकारण असो वा राजकारण महेशदादा यांचा शब्द प्रमाण मानला जातो. यामुळे बिल्डरकडून शब्द फिरवण्याची शक्यता नाही. जर पुन्हा अडचण आलीच तर माहेशदादा पाठीशी असतील यात शंका नाही. महेशदादा असताना पुन्हा पाठपुरावा किंवा इतर कायदेशीर बाबींची वेळच येणार नाही, असा विश्वास सोसायटी सदस्यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button