breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर, जागतिक अन्न उपक्रमाचा सन्मान

स्टॉकहोम – गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. आज, प्रतिष्ठेचा मानला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघाच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला जाहीर करण्यात आला आहे. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी जवळपास ३१८ जण स्पर्धेत होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा यांचीही नावे चर्चेत होती.

युद्ध-संघर्षग्रस्त भागातील शांततेसाठी परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या या वर्ल्ड फूड प्रोग्रामने मोलाची कामगिरी बजावली असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेनंतर १९६३ मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी जगभरातील विविध देशांमधून निधी दिला जातो. ‘वर्ल्ड फूड प्रोगाम’ने २०१९ मध्ये ८८ देशांतील जवळपास १० कोटी नागरिकांपर्यंत खाद्यान्न पाठवले. जगभरातील उपासमार संपुष्टात आणण्यासाठी आणि खाद्य सुरक्षितेला प्रोत्साहन देणारी ‘वर्ल्ड फूड प्रोगाम’ सर्वात मोठी संघटना आहे.
दरम्यान, गुरुवारी अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वीडीश अॅकेडमीने या पुरस्काराची घोषणा केली आहे. लुईस यांच्या अद्वितीय काव्य रचनेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने जाहीर केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button