breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: ‘दांडुक्याचा धाक दाखवा, पण सामान्यांवर वापर नको’

घरातच थांबा, असे आवाहन सरकारी यंत्रणांकडून वारंवार करण्यात येत असतानाही, घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांकडून चोप देण्याचे प्रकार वाढल्याने त्याची नागरिकांमध्ये प्रतिक्रिया उमटू लागली. दांडुक्याचा धाक दाखवा, पण सामान्यांना त्याचा प्रसाद देऊ नका, असा सावधतेचा सल्ला भाजपच्या वतीने सरकारला देण्यात आला.  या संदर्भात काही मंत्र्यांनी पोलिसांच्या या कृतीबद्दल मुख्यमंत्र्यांकडे नापसंतीची भावना व्यक्त केली.

पहिले दोन दिवस तरुण टोळक्यांनी बाहेर पडत होती. त्यांना पोलिसांना चांगलाच चोप दिला. परंतु गेल्या दोन दिवसांपासून दूध किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांनाही पोलिसांच्या दांडुक्यांचा प्रसाद दिला जात आहे. दुध वाटप करणाऱ्यांनाही पोलिसांनी चोप दिल्याच्या तक्रोरी आल्या. भाजीपाला किं वा जीवनावश्यक वस्तू मुंबई, नवी मुंबईत पोहचविल्यावर नाशिकमध्ये परतताना काही ट्रक चालकांना पोलिसांनी मारहाण केल्याचे प्रकार घडले. जिल्हाबंदीचे कारण पुढे करून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक पोलिसांनी अडविल्याच्या तक्रारी मंत्रालयात आल्या आहेत. काही मंत्र्यांनी पोलिसांच्या दडपशाहीबद्दल मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त के ली. पोलिसांच्या या दडपशाहीमुळे आधीच संतप्त असलेल्या नागरिकांमध्ये सरकारबद्दल विरोधी भावना निर्माण होत असल्याचे मत एका मंत्र्याने व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button