breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापुरात कोरोनाचे आणखी १० रूग्ण आढळले
सोलापूर : सोलापुरात सोमवारी दुपारपर्यंत नव्याने सहा तर सायंकाळपर्यंत चार असे दिवसभरात १० करोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधित रूग्णांची संख्या २५ वर पोहोचली असून यात दोन मृत व्यक्तींचाही समावेश आहेत. सध्या २३ रूग्णांवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.