breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: सोलापुरात आज तीन नवे रुग्ण आढळले, त्यातील एकाचा मृत्यू

सोलापुरात आज सायंकाळपर्यंत करोनाबाधित नवे तीन रूग्ण आढळून आले. यापैकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत रूग्णांची एकूण संख्या ६८ झाली आहेत. यात सहा मृतांचा समावेश आहे. सध्या ६२ रूग्णांवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज आढळून आलेल्या तीन रूग्णांपैकी एक महिला रूग्ण रेल्वे लाईन्स भागातील राहणारी आहे. या माध्यमातून रेल्वे लाईन्स भागात करोनाचा शिरकाव झाला आहे. दुसरा रूग्ण बापूजी नगरात राहणारा असून त्याचा मृत्यू झाला आहे. तिसरा रूग्ण सिध्देश्वर पेठेत राहणारा आहे. सहा मृत व्यक्तींमध्ये तीन पुरूष व तीन महिला आहेत. सध्या उपचार सुरू असलेल्या ६२ रूग्णांमध्ये ३९ पुरूष आणि २३ महिलांचा समावेश आहे. अद्यापि ३३६ चाचणी अहवाल प्राप्त व्हायचे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button