breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सरसकट शास्तीकर माफीसाठी माजी आमदार विलास लांडे मैदानात

  • इतर मनपांमध्ये शास्ती नसताना पिंपरी-चिंचवड पालिकेतच शास्ती कर का ?
  • माजी आमदार विलास लांडे यांचा आयुक्तांना बैठकीत सवाल

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर पूर्ण माफ करावा. एक हजार चौरस फुटांच्या पुढील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत निवासी, वाणिज्य व औद्योगिक कारणांसाठीच्या बांधकामांचा शास्तीकर वगळून केवळ मूळ मिळकतकर स्वीकारण्यात यावा. तसेच लघू उद्योजकांकडूनही मूळ मिळकतकरच स्विकारावा, अशा विविध मागण्या पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीचे अध्यक्ष विलास लांडे यांनी केल्या आहेत.

याबाबत पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील एक हजार चौरस फुटांपेक्षा अधिक अवैध बांधकामांचा शास्तीकर माफीचा निर्णय होईपर्यंत महापालिकेने केवळ मिळकतकर घ्यावा. जेणेकरून नागरिकांकडे थकबाकी राहणार नाही, मूळ मिळकतकर भरण्यास जून 2021 पर्यंत मुदतवाढ मिळावी, अनधिकृत बांधकामावरील शास्तीकर माफ करण्यात यावा, निवासी, वाणिज्य व औद्योगिक कारणांसाठीच्या बांधकामांचा शास्तीकर माफ करावा, इतर महापालिकांमध्ये शास्ती नसताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत शास्ती का ? शास्ती कर थकबाकी शासन स्तरावर फेरविचारासाठी निर्णय प्रलंबित आहे. शासनाकडून निर्णय झालेला नसताना देखील शास्ती करासाठी अट्टहास का केला जातो आहे? पूर्ण शास्तीकर माफी बाबत तात्काळ बैठक घेऊन त्याचा ठराव राज्य सरकारला पाठवावा, गुंठेवारी कायदा 2008 साली बंद करण्यात आला, त्याची मुदत वाढवून डिसेंबर 2020 पर्यंत करून बांधकामे कायदेशीर करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीचे अध्यक्ष व माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, मा. सरपंच गणपत आहेर,चिखली लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब सपकाळ,राजेंद्र चेडे, विलास नढे,उदय पाटील, आतिश बारणे, प्रवीण शिंदे, प्रमोद ताम्हणे व पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button