ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मेफेड्रोन ड्रग्ज विक्री प्रकरणी तिघांना अटक

पिंपरी चिंचवड | मेफेड्रोन ड्रग्ज विक्री प्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ड्रग्ज आणि रोख रक्कम असा एकूण 47 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.योगेश श्रीकांत हराळीकर (वय 21, रा. चिंचवडेनगर, चिंचवड), इम्रान तन्वीर शेख (वय 24, रा. खडकी, पुणे), प्रशांत बापू पाटील (वय 22, रा. बिजलीनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई सागर भोसले यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी भोसरी पोलिसांना माहिती मिळाली की, भोसरी गावजत्रा मैदानाजवळ काहीजण ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी गावजत्रा मैदान परिसरात स्मशानभूमीजवळ सापळा लावला. तीन संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 46 हजार 800 रुपयांचे 11.700 ग्रॅम मेफेड्रोन (एम डी) ड्रग्ज आणि 900 रुपये रोख रक्कम असा एकूण 47 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी हे ड्रग्ज विक्रीसाठी आणले असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलीस उपनिरीक्षक भवारी तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button