breaking-newsपिंपरी / चिंचवड

वर्धापन दिनाचा खर्च टाळून मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्यता निधीला ‘उन्नती’चा हातभार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

देशासह राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातल्याने लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यानुसार पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशनचा दुसरा वर्धापन दिन साजरा न करता होणारा खर्च मुख्यमंत्री व पंतप्रधान साह्यता निधीस देण्यात आले. या निमिताने सुमारे १ लाख १० हजाराचे धान्य वाटप करण्यात आले तर २१ हजाराचे चेक दोन्ही साह्यता निधीस देण्यात आले.

बरोबर उन्नती महिला बचत गट व आनंद हास्य क्लब हे देखील त्यांच्या बरोबरीने काम करीत आहेत . सामाजीक भान राखत उन्नती महिला बचत गटाच्या प्रत्येकी महिला १०० रु असे करीत २१० महिलांकडून मुख्यमंत्री साह्यता निधीस २१ हजाराचा चेक तर आनंद हास्य क्लब यांच्या वतीने पंतप्रधान साह्यता निधीस २० हजाराचा चेक अश्या दोन्ही सहायता निधीस चेक देण्यासाठी कुंदा भिसे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आले .त्याचबरोबर उन्नती सोशल फौंडेशन च्या वतीने समाजातील गरजुवंताना सुमारे रुपये १लाख १० हजार किमतीच्या धान्याचे मोफत वाटप करण्यात आले व नागरिकांच्या स्वच्छतेची काळजी घेत पोटॅशिअम परमॅग्नेट चे १००० पॅकेट्स चे वितरण परिसरातील परिवारांना करण्यात आले, संकट समयी माणूस माणसाच्या मदतीला जाणे हीच खरी ईश्वर सेवा मानत उन्नती सोशल फौंडेशन कार्य करीत आहे.
 

यावेळी उन्नती सोशल फौंडेशन च्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या,सध्या देशासह राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे .ज्या नागरिकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांच्यासाठी माणुसकी म्हणून आपण मदतीचा एक हात पुढे करणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे.त्यांच्यासाठी अन्न हे फार जाराजेव्हे आहे म्हणून आम्ही गरजूंना अन्न धान्याचे वाटप करणे आहे .असाच उपक्रम समाजातील दानशूर व्यक्तींनी,सामाजिक संघटनानीं राबविण्याची गरज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button