breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#CoronaVirus |सांगलीत फिरता तापाचा दवाखाना सुरु

सांगली | आयएमए मिरज, सांगली महापालिका आणि आयुष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉक्टर आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत फिरता तापाचा दवाखाना ही संकल्पना सांगलीत राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत डॉक्टर दाट लोकवस्ती असलेल्या भागात जाऊन कॅम्प उभारून डायबिटीस, हायपर टेंशन असलेल्या लोकांची तपासणी करतायत. याशिवाय खोकला, ताप, सर्दी अशी लक्षणे असणारे लोकांची तपासणी केली जातेय. यामुळे जर एखाद्याला जर कोरोनाची लक्षणे आढळली तर त्याचे स्वॅब घेण्याची प्रकिया जलदगतीने होणार आहे. पुढील 10 ते 12 दिवस हा कॅम्प सांगली, मिरज भागातील दाट लोकवस्ती असलेल्या भागात घेतला जाणार आहे.

सांगलीतील कोरोना व्हायरसचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना, सांगलीकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. नवी मुंबई येथील रहिवासी असलेली एक व्यक्ती वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथे आपल्या मूळ गावी 20 मार्च रोजी आली होती. सदर व्यक्ती रेठरे धरण येथून 10 एप्रिल रोजी मुंबईत परतली आहे. मात्र मुंबईत परतल्यानंतर या व्यक्तीची तब्येत बिघडली. उपचारसाठी या व्यक्तीला मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं. तेथे सदर व्यक्तीची कोविड- 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button