breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार सुनिल शेळके यांचा धडाकेबाज निर्णय, आजपर्यंतचे संपूर्ण वेतन विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करणार

पिंपरी / महाईन्यूज

मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल शंकरराव शेळके यांनी आपले आजपर्यंतचे वेतन तालुक्यातील गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

मावळ तालुक्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये, यासाठी आमदार शेळके नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांचा वर्षभराचा पगार सुमारे १६ लाख ९८ हजार एवढा आहे. गरीब व होतकरु मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी हे पूर्ण वेतन शैक्षणिक मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा. यानिमित्त गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

‘शिक्षण हे देशाचे भवितव्य घडवणारी अतिशय जमेची बाजू आहे. पण आजही सर्वसामान्य कुटुंबातील गरजू, आर्थिक बाजू कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे देशाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी, असे आवाहन मी माझ्या वाढदिवसाच्या आधी केले होते. त्यास प्रतिसाद देत अनेक ठिकाणी शैक्षणिक मदत केली आहे, असे आमदार शेळके यांनी म्हटले आहे.

पालकांच्या आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. अशा सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणास बळ देण्याचा माझा मानस आहे. त्या अनुषंगाने मी आमदार झाल्यापासूनचे सर्व वेतन स्वेच्छेने शैक्षणिक मदत म्हणून देत आहे.

आमदार सुनिल शेळके, मावळ विधानसभा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button