breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

#CoronaVirus: सांगलीकर स्मृती मंधाना होम क्वारंटाइनमध्ये

भारतीय महिला क्रिकेट संघात सलामीला फलंदाजीसाठी येणारी स्मृती मंधानाला तिच्या सांगलीतील घरात क्वारंटाइन करण्यात आलं आहे. २३ मार्चला स्मृती मुंबईवरुन सांगलीला परतली होती…यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तिला होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि डॉक्टर तिच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहेत.

सांगली जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आतापर्यंत सांगली जिल्ह्यात २३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत परदेशातून आलेल्या सुमारे २०० लोकांना क्वारंटाइन करण्यात आलेलं आहे. फेब्रुवारी महिन्यात स्मृती ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकात सहभागी झाली होती. ही स्पर्धा संपल्यानंतर ती मुंबईत आली. जगभरासह भारतात करोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाल्यानंतरही स्मृती मुंबईतल्या घरी होती. यानंतर २३ मार्चला ती सांगलीतल्या आपल्या घरी आली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना २५ मार्चला ही माहिती समजताच त्यांनी तिला क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिल्याचं सांगली महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे यांनी सांगितलं.

सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलसह सर्व महत्वाच्या स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. जपाननेही यंदाच्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन एक वर्षासाठी पुढे ढकललं आहे. अनेक महत्वाच्या देशात अद्यापही करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही स्पर्धा खेळवणं योग्य नसल्याचं मत अनेक क्रीडापटूंनी व्यक्त केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button