breaking-newsराष्ट्रिय

Amazonमध्ये बंपर नोकरभरती, 1300 जागांसाठी व्हेकेन्सी

ई-कॉमर्स कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे एकीकडे केंद्र सरकार त्यांच्याबाबत कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत असताना अॅमेझॉन कंपनीने भारताबाबत सकारात्मक पाऊल उचललं आहे. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कंपनी भारतात मोठ्या प्रमाणात भरती करण्याच्या तयारीत आहे. 1300 जागांसाठी कंपनीकडून नोकरभरती लवकरच सुरू होणार आहे.

अॅमेझॉनच्या संकेतस्थळानुसार, चिनमध्ये जेवढी भरती करण्याच्या विचारात कंपनी आहे त्याच्या तिप्पट भरती भारतात होणार आहे. आशियाच्या बाहेर किंवा अमेरिकेच्या बाहेर केवळ जर्मनी एकमेव असा देश आहे जेथे अॅमेझॉन कंपनी भारताएवढी नोकरभरती सुरू करणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात विविध प्रकारचे व्यवसाय आणि भूमिकांसाठी कंपनी 1300 नोकरभरती करणार आहे. दुसरीकडे चिनमध्ये 467, जपानमध्ये 381, ऑस्ट्रेलियामध्ये 250, सिंगापूरमध्ये 174, दक्षिण कोरिया 70 आणि हाँगकाँगमध्ये 10 जागांसाठी नोकभरती होणार आहे.

या क्षेत्रात नोकरी – 

अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळानुसार, पेमेंट्स, कंटेंट(प्राइम व्हिडीओ), व्हॉइस असिस्टंस(अॅलेक्सा), फूड रिटेल आणि कस्टमर सपोर्ट यांसारख्या क्षेत्रात नोकरभरती होईल. सर्वाधिक नोकरभरती बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नईसाठी असण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2018 च्या अखेरपर्यंत कंपनीने 60 हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध करुन दिल्याचं एक अहवाल सांगतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button