breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: सहा दिवसांत प्रादुर्भाव रोखणारं औषध शोधल्याचा फ्रान्सच्या संशोधकाचा दावा

जग सध्या भयंकर करोना विषाणूच्या फैलावामुळे चिंचेत आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्समधील एका संशोधकाने सध्या सगळीकडे पसरत असलेल्या COVID-19 या आजारावर औषध शोधल्याचा दावा प्रोफेसर डिडिर राऊल्ट यांनी केला आहे. या संशोधकाच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या संशोधनातून हे दिसून येते की, हे औषध विषाणूला केवळ सहा दिवसांत संक्रमक होण्यापासून रोखते. connexionfrance.com या वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.

या वेबसाईटनुसार, फ्रान्समधील एक प्रा. डिडिर राऊल्ट यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चाचणीची माहिती दिली आहे. संक्रमणामुळे पसरणाऱ्या आजारांचे विशेषज्ज्ञ असलेल्या राऊल्ट यांनी फ्रान्सच्या सरकारद्वारे जीवघेण्या करोना विषाणूच्या उपचारांसाठी संशोधन करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले होते.

प्रा. राऊल्ट यांच्या माहितीनुसार, त्यांनी करोना विषाणूची लागण झालेल्या या रुग्णांवर क्लोरोक्वाइन औषधाच्या माध्यमातून इलाज केला होता. त्यानंतर या रुग्णांच्या बऱ्या होण्याच्या प्रक्रियेत सुधारणा पहायला मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांचा संक्रामक होण्याचा कालावधी देखील कमी झालेला पहायला मिळाला.

नव्या संशोधनाने निर्माण केलेल्या या औषधाला त्यांनी प्लाक्वेनिल असे नाव दिले आहे. यामध्ये क्लोरोक्वाइन काही प्रमाणात मिसळण्यात आलं आहे. क्लोरोक्वाइन विशेषतः मलेरियापासून बचाव आणि त्याच्या इलाजासाठी वापरण्यात येते. त्यांनी सांगितलं की, आम्ही त्या सर्व लोकांना यामध्ये समाविष्ट करुन घेतलं ज्यांच्यावर करोनाचा इलाज होणार होता. यामध्ये जवळपास सर्व संक्रमित रुग्ण होते. प्रोटोकॉलनुसार, फ्रान्सच्या नीस आणि एविग्नन या दोन शहरांमधून ज्यांच्यावर अद्याप इलाज झाला नव्हता असे रुग्ण संक्रमित रुग्ण आमच्याकडे इलाजासाठी पाठवण्यात आले होते.

दरम्यान, क्लोरोक्वाइन फॉस्फेट आणि हाइड्रोक्सीक्लोरोक्वीनचा उपयोग चीनमध्ये करोनाबाधितांवर उपचारांसाठी सुरुवातीला वापरल गेलं होतं. त्याचबरोबर एचआयव्हीवर उपचारांसाठी वापरले जाणारे अॅन्टीव्हायरल औषध कालेट्राचा देखील करोनाच्या उपचारांसाठी वापर केला गेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button