breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

लॉकडाऊनमध्ये कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा लग्न सोहळा

बेंगळुरू | एका बाजुला देशभरातील अनेक सामूहिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तर दुसरीकडे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचे आज (१७ एप्रिल) लग्न सोहळा पार पडला.

या लग्न सोहळ्यासाठी अनेक व्हीव्हीआयपींनी हजेरी लावली होती. या सोहळ्याचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात आले आहे. एचडी कुमारस्वामींचा मुलगा निखिल यांचा लग्न सोहळा हा रामनगर जिल्ह्यातील एका फार्म हाऊसवर पार पाडला. या लग्नासाठी राज्य सरकारकडून परवानगी देण्यता आल्याची माहिती कुमारस्वामी यांनी सांगितले आहे. 

कुमारस्वामींच्या मुलाच्या लग्न सोहळ्यासाठी कर्नाटक सरकारकडून परवानगी देण्यात आली असून या सोहळ्यासाठी फक्त २१ कारना परवानगी दिली गेल्याची माहिती मिळाली आहे. या लग्नसोहळ्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. निखिल याचे लग्न काँग्रेसचे वरिष्ठ नेते एम कृष्णाप्पा यांच्या मुलीसोबत करण्यात आले आहे. दोघांचा साखरपुडा १० फेब्रुवारीला झाला होता.

लॉकडाऊन असले तरीही लग्न पुढे ढकलण्यात आलेले नाही. “मी रामनगरच्या उपायुक्तांकडे अहवाल मागवला आहे, पोलिस अधीक्षकांशीही बोलत आहे. आम्हाला कारवाई करावीच लागेल. अन्यथा ही यंत्रणेची संपूर्ण चेष्टा होईल, यासंदर्भातील रामनगरचे उपायुक्तांकडे रिपोर्ट मागवण्यात आला आहे,” अशी माहिती कर्नाटकटे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वनाथनाराण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button