breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

#CoronaVirus: शरद पवार काय करणार? सुप्रिया सुळेंनी शेअर केला फोटो

करोनाचं संकट आक्राळविक्राळ होत चाललं आहे. महाराष्ट्रासह देशातील करोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. झपाट्यानं पसरत चाललेल्या करोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं लोकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्यामुळे आज (२२ मार्च) सगळीकडं कर्फ्यू पाळला जात आहे. या कर्फ्यूच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय करत असतील असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचं उत्तर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवारांचा फोटो शेअर केला आहे.

करोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. गर्दी कमी व्हावी म्हणून सरकारकडून अनेक पावलं उचलली जात आहे. बसमधील गर्दी कमी करण्याबरोबरच आता लोकल सेवाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू राहणार आहे.

राजकीय नेत्यांकडूनही लोकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं जात आहे. लोकांनी शक्य होईल तितका सामाजिक जीवनातील वावर कमी करावा, असं नेत्यांकडून सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंब घरी बसून काय करतंय याची माहिती सोशल मीडियातून नागरिकांना दिली आहे. त्याचबरोबर लोकांनी घरी बसून करोनाच्या प्रसाराला आळा घालावा, असं आवाहनही केलं आहे.

https://www.instagram.com/p/B9_z74mj0wh/?utm_source=ig_embed&ig_mid=40166074-DC49-4339-BCD0-075B9AB58087

करोनामुळे महाराष्ट्रात अनेकांना संसर्ग झाला आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानं अनेकांना लागणं झाली असून, राजकीय नेत्यांनी करोनानं भारतात शिरकाव केल्यापासून सार्वजनिक कार्यक्रमांना जाणं बंद केलं आहे. शरद पवार यांनीही सुरुवातीच्या काळात अनेक दौरे रद्द केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button