breaking-newsपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus : व्यायामासाठी सकाळी घराबाहेर पडलेल्या १०० जणांना पोलिसांच्या काठीचा दणका

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने संचारबंदीच्या कालावधीत सकाळी व्यायाम करण्यासाठी घराबाहेर घुटमळणा-या 100 जणांवर सांगवी पोलिसांनी कारवाई केली आहे. काही जणांवर गुन्हे, काहींना शिक्षा तर काहींना खडेबोल सूनाववल आहेत.

पिंपरी चिंचवड शहराला रविवारी रात्रीपासून कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. 19 ते 27 एप्रिल या कालावधीत शहरात कुणालाही घराबाहेर फिरण्यास मुभा नाही. तसेच शहरातून बाहेर आणि बाहेरून शहरात येण्यासही बंदी आहे. पोलिसांनी यासाठी नाकाबंदी वाढवली असून शहरात देखील विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. सोमवारी सकाळी सांगवी परिसरात काहीजण विनाकारण फिरताना आढळून आले. पोलिसांनी या सर्व बहाद्दरांना सांगवी पोलीस ठाण्यासमोर आणले. सकाळी सर्वांना भर रस्त्यावर बसवून त्यांना खडेबोल सुनावण्यात आले. सांगवी पोलिसांनी काही जणांना काठीचा प्रसादही दिला. तर काही जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार गुन्हेही दाखल केले.

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी तसेच कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. हा सर्व खटाटोप नागरिकांच्या सुरक्षेसाठी असताना नागरिक मात्र काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र दिसत आहे. एमआयडीसी भोसरी, निगडी यानंतर सांगवी पोलिसांनी नागरिकांवर वेगवेगळ्या पद्धतींनी कारवाई केली आहे. तसेच सर्व पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान, सीआरपीसी, मुंबई पोलीस कायदा, साथरोग कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा अशा विविध कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button