breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

#CoronaVirus: वर्धा मध्ये तारफाईल भागात आठ वर्षीय बालकाचा बॅरलमध्ये आढळला मृतदेह

झोपडपट्टी परिसर असलेल्या तारफाईल भागात एका आठ वर्षीय बालकाचा गळा दाबून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने चांगलाच तणाव निर्माण झाल्याने रॅपिड अॅक्शन फोर्सची टीम तैनात करण्यात आली आहे. आज रात्री ७ वाजता ही घटना उघडकीस आली. मृतावस्थेत आढळेलं बालक शेजारच्याच एका युवकासोबत फिरायला गेल्याचे दिसले होते. त्यामुळे परिसरातल्या नागरिकांनी संशयातून त्याला झोडपून काढले. त्यामुळे या संशयित युवकास सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बालकाचा गळा दाबून खून करीत त्याला पाण्याच्या ड्रममध्ये डांबून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने संतप्त चारशेवर नागरिकांनी वर्धा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत संताप व्यक्त केला. बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आला असून या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button