breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जिल्हा परिषदेतील अनुचित प्रकारांवर ‘करडी नजर’

  • आणखी 30 ते 35 सीसीटीव्ही लावण्याच्या कामाला सुरुवात

पुणे – जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारापासून प्रत्येक मजल्यावरील परिसरातील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आणखी सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सर्व विभाग आणि प्रवेशद्वार असे एकूण 30 ते 35 सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. त्यामुळे कामचुकार आणि वायफळ गप्पा मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना आळा बसणार असून, एखाद्या अनुचीत प्रकारामध्ये खरे-खोटे करण्यासाठी सीसीटीव्हीची मोलाची मदत होणार आहे.

जिल्हा परिषदेतील कामांमधील विस्कळीतपणा दूर करून शिस्तबध्दता आणायची आहे. नागरिकांची कामे वेळेत झाली पाहिजे. कार्यालयातील कर्मचारी कशाप्रकारे काम करतात, नागरिकांशी कसे वागतात हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून दिसणार आहे. त्यामुळे प्रत्येक विभाग या सीसीटीव्हीच्या नजेरत आणण्यासाठी कॅमेरे वाढवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कामामध्ये नक्कीच चांगला बदल झालेला दिसेल.
– सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, नागरिक दिवसभर बसूनही त्याचे काम होत नाही, अधिकारी केबीनमध्ये नसल्यावर कर्मचारी निवांत गप्पा मारत बसतात यासह काही माथेफिरू व्यक्ती कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याचा घटना वेळोवेळी मुख्य कार्यालयात घडतात. त्यावरून आरोप-प्रत्यारोप होतो.

मात्र, ते सिध्द करताना अनेक अडचणी येतात. जिल्हा परिषदेमध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. मात्र, त्यामध्ये जिल्हा परिषदेचा संपूर्ण परिसर व्यापला जात नाही. त्यामुळे सर्व परिसर, विभागीय कार्यालय हे सीसीटीव्हीच्या नजेर येण्यासाठी आणखीन सीसीटीव्ही बसवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी सूचना दिल्या. त्यानुसार जिन्यातून किंवा लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर एखाद्या विभागात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची एन्ट्री ही सीसीटीव्हीमध्ये कैद होणार आहे.

तसेच विभागातील सर्व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी दोन्ही बाजूनी सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. हे सर्व चित्रीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या केबीनमध्ये बसून पाहणार आहेत. त्यामुळे सीटीव्हीच्या माध्यमातून एखादा कर्मचारी कामचुकारपणा करताना दिसला तर त्याच्यावर थेट कारवाई होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button