breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय

ट्वीटरची चिमणी गायब! इलॉन मस्क यांनी बदलला ट्विटरचा लोगो

Twitter : एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केली. यानंतर त्यांनी अनेक बदल केले आहेत. पेड सबस्क्रिप्शन असेल, ले ऑफ असेल किंवा सीईओची नेमणूक असेल. दरम्यान, एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलला आहे. सोशल मीडिया कंपनी लवकरच आपला लोगो बदलणार असल्याची घोषणा त्यांनी काही दिवसांपुर्वी केली लगेचच याचे अनावरण केलं आहे.

नवीन लोगोसह ट्विटर मुख्यालयाचा फोटो सीईओ लिंडा याकारिनो यांनी पोस्ट केला. एलॉन मस्क यांनी आपल्या प्रोफाईलवरील डिस्प्ले पिक्चर देखील बदलले आहे. ट्विटर आता एक्स (X) आहे. गुगल सर्च इंजिनमध्ये X.com टाईप केल्यावर Twitter उघडणार आहे. ट्विटरचा लोगो बदलला आहे. आता तुम्हाला फक्त पक्ष्याच्या जागी X दिसेल.

हेही वाचा – विधान भवनात आंदोलन करणाऱ्या रोहित पवारांना अजित दादांनी फटकारलं; म्हणाले..

एलन मस्क यांनी त्याच्या ट्विटर बायोमध्ये नवीन लिंकदेखील शेअर केली आहे. ट्विटरच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी रविवारी घोषणा केल्यानंतर त्यांचे पहिले ट्विटदेखील शेअर केले आहे. लिंडा याकारिनो यांनी म्हटले आहे की, X ही भविष्यातील अमर्याद संवादासाठी आहे. हे ऑडिओ, व्हिडिओ, मेसेजिंग, पेमेंट्स/बँकिंग आदीमध्ये केंद्रीत आहे. हे कल्पना, वस्तू, सेवा आणि संधींसाठी जागतिक बाजारपेठ निर्माण करते. AI द्वारे समर्थित X आम्हा सर्वांना अशा प्रकारे जोडेल ज्याची आम्ही कल्पना करू लागलो आहोत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button