breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यावरुन केंद्र सरकारने सध्या चर्चा सुरु आहे. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपासून तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. देशात ज्या पद्धतीने कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. ते पाहता लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. बहुतांश राज्यांनी या प्रकरणी केंद्रावरच निर्णय सोपवला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी कोरोनावरुन उच्च अधिकार प्राप्त मंत्रिमंडळ गटाच्या बैठकीत देशभरातील स्थितीचा आढावा घेतला. बैठकीत आवश्यक वस्तूंच्या पुर्ततेसमवेत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत जे संकेत मिळाले, त्यानुसार लॉकडाऊनचा कालावधी आणखी २ आठवडे वाढवला जाण्याची शक्यता आहे. 

देशाची अर्थव्यवस्था आणि इतर क्षेत्रांवर पडत असलेला प्रभाव पाहता लॉकडाऊनमध्ये काही दिलासा दिला जाऊ शकतो. जे लोक सध्या विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या ठिकाणावर पोहोचवले जाऊ शकते. पण ज्यांच्यावर उपचार किंवा कायदा-सुव्यवस्थेशी निगडीत लोकांना जिथे आहे तिथेच ठेवले जाऊ शकते. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button