breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वखर्चाने रेशन धान्य वाटप करणाऱ्या सरपंच जीनत सय्यद ठरल्या पहिल्या महिला सरपंच

उस्मानाबाद| महाईन्यूज

ग्रामपंचायत बेलगाव पिंपळगाव येथील महिला सरपंच जीनंत कोहिनूर सय्यद यांनी कोरोनाव्हायरस च्या आपत्तीमुळे हातचा रोजगार निघून गेल्यामुळे व उपासमारीची वेळ आली असल्यामुळे अशा लोकांना मदतीचा हात म्हणून स्वखर्चाने दोन्ही गावातील लोकांना मोफत रेशनचे धान्य दिनांक 3 रोजी वाटप केले.

प्रत्येक व्यक्तीला 2 किलो तांदूळ व 3 किलो गहू या प्रमानात वाटप करण्यात आले,सरपंच जीनत सय्यद यांचे दीर कै. बादल सय्यद यांचे स्मरणार्थ पिंपळगाव येथे तर कै.वायुपुत्र नारायणराव जगदाळे बार्शी यांचे स्मरणार्थ बेलगाव येथे रेशनचे धान्य मोफत वाटप करण्यात आले.या कामी त्यांना ग्रामसेवक राऊत बी एस व पोलीस पाटील कविता वंजारी यांनी सहकार्य केले.

यावेळी रेशन धान्याचे वाटप भूम नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते रोहन जाधव, हॉटेल उद्योजक तथा माजी नगरसेवक सोपानराव वरवडे, शिक्षक संघटनेचे मराठवाडा विभाग संघटन कोहिनूर सय्यद ,ग्रामसेवक राऊत बी एस, उपसरपंच लाडूबाई शेख, माजी सरपंच बाजीराव दातखिळे, ग्रामपंचायत सदस्य अमोल कोळी ,गोकुळ मस्के कृष्णा मराळे योगेश ढगे,युवराज ढगे,पोलीस पाटील कविता वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button