breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus : लखनऊमध्ये 25 वर्षीय डॉक्टरलाही कोरोनाची लागण

लखनऊ | कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे लखनऊमध्ये 25 वर्षीय निवासी डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा डॉक्टर लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीत कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आला.

किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीत कॅनडाच्या एका कोरोनाबाधित महिला डॉक्टरवर उपचार सुरु होते. याशिवाय तिच्या पतीलाही तिथे निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. त्या दोघांच्या संपर्कात आल्यामुळे किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या निवासी डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली.कॅनडाची निवासी महिला डॉक्टर गेल्या आठवड्यात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात आली होती. या महिलेचं सासर लखनऊचं आहे. तिच्यासोबत तिचा पतीही कॅनडाहून आला होता. या महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने तिला लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीत दाखल करण्यात आलं.

तिथे उपचारादरम्यान महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. या महिलेला लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं. याशिवाय तिच्या पतीलाही दुसऱ्या कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं.दरम्यान, किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षात महिलेवर उपचार करत असताना लखनऊच्या 25 वर्षीय निवासी डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली. त्याच्यासोबत अन्य 14 जणांची ही मेडीकल टेस्ट करण्यात आली. त्यात इतर 14 जणांना कोरोनाची लागण नसल्याचं निषपन्न झालं. या डॉक्टरलाही विलगीकरण कक्षात ठेवलं असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती हॉस्पिटलचे प्रवक्ते डॉ. सुधीर सिंह यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button