breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

निर्भयाच्या दोषींच्या पुतळ्याला फाशी देऊन फाशीची ट्रायल पूर्ण

नवी दिल्ली | महाईन्यूज |

तारिख पे ताऱिख करत अखेर निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील दोषींना २० मार्च रोजी फासावर लटकावण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी या फाशीची रंगीत तालीम तिहार तुरुंगात पार पडली. यासाठी निर्भयाच्या दोषींचे ‘डमी’ फासावर लटकावण्यात आले. यावेळी, निर्भयाच्या दोषींना फाशी देणारा जल्लाद पवन यानं तुरुंग प्रशासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोषींच्या पुतळ्याला फाशी देऊन ट्रायल पूर्ण केली.

तिहार प्रशासनानं दोन दिवसांपूर्वीच जल्लाद पवन याला तुरुंगात पाचारण केलं होतं. दिल्लीच्या न्यायालयानं २० मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी केलंय.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषी मुकेश, पवन गुप्ता , विनय शर्मा , अक्षयकुमार सिंह यांचे सर्व कायदेशीर पर्याय जवळपास संपुष्टात आलेत. राष्ट्रपतींनीही या दोषींची दया याचिका फेटाळून लावलीय. पण, आता या दोषींपैकी तिघांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला फाशीपासून वाचविण्यासाठी पत्र लिहिलंय. तर यातील एकाच्या पत्नीनं आपल्या दोषी पतीला वाचविण्यासाठी घटस्फोटाचा अर्ज दाखल केलाय. मात्र त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाहीय…कारण तसही तिहार तुरुंग प्रशासनानं सगळी तयारी पूर्ण केलीय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button