breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: रेल्वे आरक्षणासाठी १२० दिवसांची मुदत
रेल्वेने सर्व विशेष गाडय़ांसाठीच्या आरक्षणाची मुदत गुरुवारी ३० दिवसांवरून १२० दिवसांपर्यंत वाढविली आहे. रेल्वे मंत्रालयाने सर्व विशेष गाडय़ांच्या अग्रीम आरक्षणाचा कालावधी सध्याच्या ३० दिवसांवरून १२० दिवसांपर्यंत वाढविला आहे. येत्या १ जूनपासून २०० नव्या विशेष गाडय़ा धावणार आहेत, त्याचप्रमाणे ३० राजधानी गाडय़ा १२ मेपासून धावत आहेत.