breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: रुग्णांना हिंसक वागणूक देऊ नका- राजेश टोपे
एखाद्या माणसाला करोनाची लागण झाली म्हणून त्याला हीन वागणूक देऊ नका. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हे मला आज आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे. कारण एखाद्याला करोना झाला म्हणजे त्याला हीन वागणूक दिली जाते असे प्रकार समोर आले आहेत. करोनाच काय एखाद्याला होम क्वारंटाइन केलं तरीही त्याला दिली जाणारी वागणूक हीन असते. अशा वागणुकीमुळे त्याचे मनोधैर्य खचू शकते त्यामुळे कुणालाही अशी वागणूक देऊ नका अशी विनंती मी तुम्हाला करतो आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.