breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

अंघोळीची गोळी संस्थेचा पुणे शहरात खिळेमुक्त झाडं उपक्रम

पुणे महानगपालिका आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन उपक्रमात सहभागी

पुणे : अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमाने सातत्याने पर्यावरणपुरक उपक्रम राबविण्यात येत असतात ह्याच टीमने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय परिसरातील झाडांवरील खिळे, बॅनर, पोस्टर काढण्याचा सुत्य उपक्रम पार पाडला. झाडांनाही संवेदना असतात तेही सजीव आहेत या उपक्रमाच्या माध्यमाने त्यांच्या वेदना कमी करण्याचा या युवकांना प्रयत्न केला.

खिळेमुक्त झाड आणि आळेयुक्त झाड हा उपक्रम महाराष्ट्रभर विविध भागात राबविला जात आहे. वृक्ष संवर्धन हेच हवामान बदलास उत्तर आहे त्यामुळे खिळेमुक्त झाडं हा उपक्रम सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा असे आवाहन अंघोळीची गोळी संस्थेचे अविनाश पाटील यांनी यावेळीं केले. पुण्याच्या माधव पाटील या तरूणाने सुरु केलेली खिळेमुक्त झाडं मोहीम विस्तारण्यासाठी अनेक युवक प्रयत्न करत आहे आणि पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे.

या मोहिमेत युवकांनी प्रामुख्याने झाडांना खिळेमुक्त, पोस्टरमुक्त, बॅनरमुक्त करण्याचा प्रयत्न केला. पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम आणि राष्ट्रीय ग्रीन ट्रिब्युनल यांत झाडांसंदर्भात अनेक कायदे आणि नियम स्पष्टपणे अधोरेखित असले तरी आपल्याकडे ते पाळले जात नाही त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील यांसाठी आमचा प्रयत्न चालु आहे आणि या उपक्रमात पुणे महानरपालिकेच्या उद्यान विभागाने देखील आपले योगदान देण्याच्या संकल्प केला आहे.

हेही वाचा – समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

वृक्ष संवर्धनासाठी महानगरपालिकेच्या आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पर्यावरण विषयक कायद्याची तोंडओळख आजच्या उपक्रमाच्या माध्यमातून उपस्थित सर्वांना करून दिली. उपक्रमात संस्थेचे कार्यकर्ते तेजश्री पाटील, अनुराधा ठाकुर, संस्कृती रासकर, आप्पा घोरपडे, शरद बोदगे, अमित निखार, संदीप काळे, धनंजय ठाकरे, उमेश कामटेवाड, हम्पी बोदगे उपस्थित होते.

कमिन्स इंडिया फाउंडेशन सुरेश गोडांबे आणि राजेंद्र वाघ यांनी देखील उपक्रमात आपले सक्रिय योगदान दिले. सागर मोरे, विशाल बेलदरे, नवनाथ कदम, दशरथ टिळेकर या महापालिकेच्या कार्यकर्त्यांनी देखील हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला. पर्यावरण संवर्धनासाठी खिळेमुक्त मोहीम महाराष्ट्रभर व्यापक करण्याचा म्हणजेच हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हवामान ठोसा देण्याचा म्हणजेच पर्यावरण संवर्धनासाठी शक्य ती कृती करण्याचा संकल्प या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button